किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला संपन्न झालेल्या SCO शांघाय को-ऑपरेशन संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेत चीन, रशियासह एकूण १० देशांचे राष्ट्रप्रमुख सामील झाले होते. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान आणि इस्लामिक रिपब्लीक ऑफ पाकिस्तानचे पंतप्रधान मियां शेहबाज शरीफ देखील सामील झाले होते. फिरत्या अध्यक्षपदाच्या रचनेत यावर्षी हे अध्यक्षपद इस्लामिक रिपब्लीक ऑफ पाकिस्तानकडे गेले आहे.
ज्या शिखर परिषदेदरम्यान पाकिस्तानच्या PMO च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सगळ्या राष्ट्रप्रमुखांचा एकत्रित फोटो शेअर करताना तो अशा प्रकारे क्रॉप (कापला) करण्यात आला की, ज्यामुळे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्यासह अनेक नेते फ्रेममधून बाहेर टाकले गेले. या एडिटिंगमुळे शहाबाज शरीफ हे त्या ग्रुप फोटोच्या अगदी “मध्यभागी” (Centre stage) हायलाइट झाले आहेत. या क्रॉप केलेल्या फोटोवरून जगभरातून सोशल मीडियावर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची प्रचंड खिल्ली उडवली गेली. भारताच्या PMO ने आणि स्वतः पंतप्रधान मोदींनी मूळ आणि न कापलेला संपूर्ण फोटो शेअर केल्यामुळे पाकिस्तानच्या एडिटिंगचे पितळ उघडे पडले. नेटकऱ्यांनी याला पाकिस्तानची Dirty Tricks, “अपरिपक्व मुत्सद्देगिरी” आणि “इनसिक्युरिटी” (असुरक्षिततेची भावना) म्हणत खिल्ली उडवली. जगभरातून झालेल्या जबरदस्त ट्रोलिंगमुळे मियां शहाबाज शरीफ यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ मोडमध्ये येत आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व जागतिक नेते असलेला मूळ आणि संपूर्ण फोटो पुन्हा पोस्ट केला.
थोडक्यात, स्वतःला जागतिक मंचावर महत्त्वाचे दाखवण्याच्या नादात पाकिस्तानने हा पोरकट प्रकार केला. एका अर्थी हा १४० कोटी भारतीयांचा जाणूनबुजून केलेला अपमान देखील होता. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाल्यावर त्यांना संपूर्ण फोटो पुन्हा टाकून आपली चूक सुधारावी लागली. मियां शहाबाज शरीफ यांचा (काफीर) हिंदुबहुल भारत द्वेष आम्ही समजू शकतो. त्या द्वेषाच्या आधारावरच त्यांच्या देशाची निर्मिती झाली आहे.
पण इराण हा तर एक इस्लामिक देश आहे. फोटो क्रॉप करताना मोदीजींबरोबर त्याचेही राष्ट्रपती वगळले जातील इतकी कोती मनोवृत्ती एखाद्या इस्लामिक देशाच्या पंतप्रधानाची असावी याचेच आम्हाला आश्चर्य वाटते. मियां शहाबाज शरीफ एका देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचार (protocol) माहीत नसेल हे शक्यच नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूरच्या दणक्याने मियां शहाबाज शरीफ आणि त्यांचा पाकिस्तान पुरता हादरला आहे. त्यात सिंधू जलवाटप करार स्थगित करून भारताने त्यांची पुरती कोंडी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वापुढे पाकिस्तानचे नेतृत्व हतबल झालेले दिसते.
यात भरीला भर म्हणून गेल्या १२ वर्षात भारताने केलेली सर्वांगीण प्रगती मियां शहाबाज शरीफ यांच्याच्याने बघवली जात नाहीये. आपला देश भिकेला लागलेला असताना भारताने एव्हढी गरुड भरारी घेतलीच कशी? या न सुटणाऱ्या कोड्यामुळे मियां शहाबाज शरीफ यांचा जळफळाट झाला नाही तरच नवल. त्या हतबलतेतूनच त्यांनी आमच्या पंतप्रधानांचा फोटो क्रॉप करण्याचे पाप केले आहे.
दुसऱ्या बाजूला इराण हा इस्लामिक देश असला तरी सुन्नी बहुल इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या दृष्टीने तो काफीरांचाच देश आहे कारण, इराण हा शियाबहुल देश आहे. दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात कार्यरत असलेले बलुच फुटीरतावादी आणि अतिरेकी गट (उदा. जैश अल-अदल) हा त्यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा आहे. सीमेवरील सुरक्षेवरून आणि या गटांच्या कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला आहे.
इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्यस्थ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या भूमिकेमुळे इराणला पाकिस्तानच्या विश्वासार्हतेविषयी कायम शंका येते. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये अस्थिरता आली आहे. शिवाय इराणचे भारतासोबतचे वाढते संबंध (उदा. चाबाहार बंदर) आणि पाकिस्तानचे अमेरिकेसोबतचे जुने संबंध यामुळे पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितसंबंधांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. परिणामी, पाकिस्तान इराणचा द्वेष करतो आणि त्याची परिणती इराणचे राष्ट्रपती राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांचाही फोटो क्रॉप करण्यात झाली.
एकंदरीत झालेल्या क्रॉप प्रकाराने पाकिस्तानच्या भारताविषयीच्या द्वेषपूर्ण वर्तणुकीचे पितळ जागतिक व्यासपीठावर चांगलेच उघडे पडले आहे. जगात नाचक्की झाली ते वेगळेच. नंतर ‘डॅमेज कंट्रोल’ साठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व जागतिक नेते असलेला मूळ आणि संपूर्ण फोटो पुन्हा पोस्ट करूनही “बूंद से गयी सो हौद से नही आयेगी” हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
नरेंद्र मोदी हे भारताच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले अत्यंत लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो क्रॉप करून किंवा भिंतीवरून उतरवून त्यांचे कर्तृत्व झाकले जाईल असे ज्यांना वाटते, ते सूर्यावर थुंकत आहेत. त्याने सूर्याला काहीच फरक पडत नाही मात्र थुंकी थुंकणाऱ्यांच्याच तोंडावर पडते.