Saturday, July 27, 2024

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान

Share

महाराष्ट्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी जितेंद्र आव्हाड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप आहे. यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापले असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका करत थेट जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अमोल मिटकरींनी ट्विट केलं आहे, “जाहीर निषेध ! जाहीर निषेध ! स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध ! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी,” असं ते म्हणालेत.

जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख