Tuesday, December 3, 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

Share

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आधी शेतकऱ्यांचे सुधीरडीकरण होणे गरजेचे आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे त्या योजनेचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात.
त्याचबरोबर शेतीत सोबत जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन मधुमक्षिका पालन यांसारख्या योजनाही उपलब्ध करून दिला जातात.

महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत 4000 कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील 5142 गावांमध्ये या योजनेचा लाभ घेतला जातो. ही योजना गाव पातळीवर असून शेतीसाठी लागणारी वेळोवेळी मदत या योजनेमार्फत केली जाते.

आता बघुयात या योजनेचे अंतर्गत कोणते कोणते प्रकल्प येतात:

  • भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे.
  • एकाल्मिक पॅक हाऊस / कृषि उ्त्पादनाचे संकलन केंद्र
  • पॅक हाऊस निर्मिती
  • फळ पिकवणी केंद्र
  • भाजीपाला, फळ प्रक्रिया केंद्र
  • औषधी / सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट वेंडिंग कार्ट
  • रेफ्रिजरेटेड व्ॅन किंवा भाजीपाला/ फळे वाहतुकीसाठी वाहना/ वाहन
  • शीतगृह गोदाम व छोटे वेअर हाऊस >
  • धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छत्ता। प्रतवारी युनिटसह) >
  • कडधान्य मिल (दाल मिल)
  • अन्न प्रक्रिया यूनिट
  • तेल गाळप युनिट
  • मुरघास युनिट
  • मसाले युनिट
  • हळद प्रक्रिया युनिट
  • मधुमक्षिका पालन युनिट
  • दुध प्रक्रिया युनिट
  • निंबोळी अर्क युनिट
  • शेळी पैदास केंद्र (बांधकाम, उपकरणे, संयंत्रे व पैदास पशुसमुहा Broeder Stock )
  • कांदा चाळ (सामुहिक)
  • बियाणे प्रक्रिया उपकरणे >
  • बियाणे प्रक्रिया शेड/ सुकवणी यार्ड
  • बियाण्यांची साठवण/ गोदाम संपूर्ण
  • बीजप्रक्रिया युनिट (संयंत्र, गोडाऊन/ शेड सह)
  • इतर कृषि व्यवसाय

भूमिहीन कुटुंबातील शेतकरी विधवा महिला त्याचबरोबर अनुसूचित ते जाती जमातीतील महिला यांना कुक्कुटपालन व शेती पालनाचा लाभ मिळतो.

नवीन विहीर खोदण्यासाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,50,000 अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील तुम्ही हा अर्ज भरू शकतात.

अन्य लेख

संबंधित लेख