Wednesday, August 19, 2026

अहिल्यानगरमध्ये कपाळवरील टिळा पाहुन धीरज परदेशीची हत्या

Share

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर येथील दर्गा दायरा या मुस्लिमबहुल भागात महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची कट रचून हत्या करण्यात आली. विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी गेले असता, कपाळावर भगवा टिळा असल्यामुळे केवळ हिंदू धर्मीय असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर जमावाने कोयता आणि बांधकामाच्या बल्ल्यांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

तपास आणि अटक

  • एकूण आरोपी: या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
  • अटक केलेले आरोपी: पोलिसांनी आज आरमान लियाकत सय्यद, हुजैफ साजिद शेख आणि मोहम्मद रशाद इम्रान सय्यद यांना अटक केली. याआधी मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, अक्रम याकूब सय्यद, वसीम रहीम सय्यद, इम्रान मुसा सय्यद आणि जाहीद नुसरत शेख यांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
  • पोलीस कोठडी: आज अटक केलेल्या तिघांसह एकूण १० आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
  • पसार आरोपी: अबजीमिया याकूब सय्यद आणि राहील शेख हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हत्यार व जप्त केलेली वाहने हल्ल्यासाठी रिक्षामधील कोयता आणि बांधकामाच्या बल्ल्यांचा वापर करण्यात आला. भिंगार पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींच्या वापरातील खालील वाहने जप्त केली आहेत:

  • इम्रान सय्यद यांची मोपेड दुचाकी
  • मुस्तकीम सय्यद यांची दुचाकी
  • मेहराज सय्यद यांची ॲपेरिक्षा
  • अक्रम सय्यद यांची ॲपेरिक्षा
  • वसीम सय्यद यांची मोटारकार
  • जाहीद शेख यांची मोपेड दुचाकी

तपासाची पुढील दिशा हत्या करण्याचा कट नेमका कसा रचला गेला, आरोपींमध्ये कसा संपर्क झाला आणि यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असून, हत्येनंतर आरोपींना हैदराबादला पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी कोणी मदत केली का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख