Sunday, May 26, 2024

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली

Share

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका (Teachers and Graduates Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आज याबाबतची घोषणा केली आहे. १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार होती. १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आली आहे. आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

अन्य लेख

संबंधित लेख