Monday, June 24, 2024

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक

Share

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Pune Accident) अपघात प्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agrawal) यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपी सोबत असलेल्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) हा देखील पोलीस कोठडीत आहे, तर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात आहे. तसेच प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशन कडील तपास गुन्हे शाखेकडे केला जाणार आहे.

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल याची गुरुवार 23 मे रोजी चौकशी करण्यात आली. या चौकशीत नातवाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली चौकशीत दिली होती. तसेच नातू अल्पवयीन असल्यााचा देखील दावा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता. नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी सुरेंद्र अग्रवाल यांनी केली होती.

या प्रकरणात ज्या वेळी अपघात घडला त्यावेळी अल्पवयीन आरोपीचे शेजारी ड्रायव्हर बसला होता गंगाराम पुजारी याला सुरेंद्र कुमारने डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख