Saturday, September 7, 2024

पुणे निवासी विदर्भवासी निघाले मतदानाला…

Share

देशहितासाठी मतदान आणि शंभर टक्के मतदान याच्या प्रचारासाठी संपूर्ण देशात हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. आपापल्या भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अनेक उपक्रमही आखले जात आहेत. पुण्यातील विदर्भ निवासींसाठीही असाच एक सशुल्क उपक्रम होत आहे. हा उपक्रम पुण्यातील विदर्भवासी एकत्र य़ेऊन करत आहेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे शुल्क देऊन त्यात सहभागी व्हायचे आहे, त्यादृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व मोठे आहे.

पुणे निवासी नागपूरकर युवकांना तसेच पुण्यातील विदर्भवासीयांना येत्या १९ एप्रिलच्या लोकसभेच्या मतदानासाठी सशुल्क बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विदर्भ मित्र मंडळातर्फे ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही पद्धत असून प्रत्येक नागरिकाने मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाने आपली लोकशाही अधिक सशक्त बनते. देशाच्या हितासाठी मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन विदर्भ मित्र मंडळातर्फे केले जात आहे.

यावेळेची लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे भवितव्य ठरविणारी असल्याने देशहितासाठी शंभर टक्के मतदान व्हावे तसेच धर्माधारित भेदभाव न करता एक सशक्त सरकार पुनश्च निवडून यावे यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे, त्यासाठी हा उपक्रम केला जात असल्याची माहिती विदर्भ मित्र मंडळाचे श्रीपाद बोरीकर यांनी दिली.

उपक्रमाचे स्वागत
सर्व अडचणींवर मात करून नागरिकांनी लोकशाहीमध्ये लोकसभा मतदानाचा हक्क बजावावा असेही आवाहन प्रबोधन मंच, विदर्भवासी पुणे निवासी, विदर्भ मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती आम्ही ज्यांना ज्यांना सांगत आहोत, त्यांच्याकडून उपक्रमाचे स्वागत होत आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही चांगला उपक्रम करत आहात, अशीही प्रतिक्रिया येत आहे. पुण्यातून अशी व्यवस्था पहिल्यांदाच होत आहे. शंभर टक्के मतदानाचे आवाहन तर आम्ही नेहमीच करतो, पण यावेळी शंभर टक्के मतदान होण्यासाठी आम्ही इथे प्रत्यक्ष काम करत आहोत. प्रतिसाद छान आहे आणि दोन बस बुक झाल्या आहेत, अशीही माहिती बोरीकर यांनी दिली.

Nagpur Railway Station

सध्या नागपूरला जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची आरक्षणे फुल्ल आहेत. ज्यांची नावे नागपूरच्या मतदार यादीमध्ये आहेत आणि जे सध्या पुण्यात नोकरी निमित्त वा अन्य कारणाने पुण्यात रहायला किंवा शिक्षणासाठी, व्यवसायासाठी किंवा काही कामासाठी आले आहेत अशांना नागपूरला (१९ एप्रिल) मतदानाला जाण्यासाठी विदर्भ मित्रमंडळातर्फे सशुल्क बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक मतदान करणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी श्रीपाद उर्फ छोटू बोरीकर यांच्याशी संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी भ्रमण ध्वनी क्रमांक – ९८८१२००३६९ किंवा ७५१७७७१३६९ हे आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख