Saturday, September 7, 2024

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी

Share

महाराष्ट्र : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना (Shivsena) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं.

काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले “मी संजय निरुपम यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्तादेखील आता शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय निरुपम यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं होतं. संजय निरुपम यावेळी लोकसभा निवडणूक लढवू इच्छुक होते. ते पक्षात सहभागी झाले आहेत. पण त्यांना त्यामोबदल्यात काहीच मिळालं नाही. हे माहिती असूनही त्यांनी ते शिवसेनेचं काम करण्यासाठी पक्षात सहभागी झाले. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“20 वर्षानंतर आज मी स्वगृही परत येत आहे. एकटा नाही, तर संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी आज खूप आनंदी आहे. माझ्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. गेल्या 20 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होतो, 2005 मध्ये मी शिवसेनेतून बाहेर गेलो. काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचाराने काम करण्यात अडचण येत होती, ती अडचण आता आम्ही दूर केली आहे”, असं संजय निरुपम म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख