Saturday, September 7, 2024

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

Share

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्याची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? यावर बरेच महिने तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबईप्रमाणे ठाणे, कल्याणची जागा सुद्धा शिंदे गटाने आपल्याकडे राखली आहे. कल्याणमधून (Kalyan) महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर ठाण्यातून (Thane) नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख