Saturday, July 27, 2024

नरेंद्र मोदी यांचे झंझावाती दौरे: लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल राखण्यासाठी आवाहन

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा एक राजमार्ग म्हणून पाहिला जात आहे. तिसऱ्या आणि चौथा टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, बीड अशा महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढती होणार आहेत. महायुती तसेच भाजपासाठी हे दोन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात याची प्रतिती प्रत्येक वेळी प्रचारसभा आणि रोड शोजच्या वेळी येते. हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असतात. या गर्दीतही मोदीजींचा फोटो घेऊन उत्साहाने उभी असलेल्या मुलीने रेखाटलेल्या फोटोची दखल मोदीजींनी घेतली. ही त्यांची पोचपावती आहे.  

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव तसेच लातूर येथे प्रचार सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ मतदारसंघात निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात एकूण 3 सभा झाल्या. राज्यात होत असलेल्या या सभांमध्ये पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सोलापूरमधील सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली. मी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. जानेवारी महिन्यात मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो. आज मी विकासाच्या गॅरंटीवर मत मागतोय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या राजवटीच्या तुलनेत गेल्या दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले आहे, तेवढे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए सरकारने केले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित निवडणूक सभेत ते बोलत होते. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीकोनातून आपण चोवीस तास काम करत आहेत. असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. 

सर्व नागरिकांनी मतदान करावे असे आवाहनही पंतप्रधानांनी मतदारांना केले आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख