Tuesday, August 18, 2026

भविष्याकडे वाटचाल, नवीन आव्हानांचा सामना आणि क्षितिजाकडे झेप घेण्याचा उद्देश – भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

Share

भारतीय जनता पक्षाची भविष्याकडे बघण्याची दृष्टी आणि आगामी नियोजनानूसार वाटचाल करण्याच्या उद्देशाने कामाला गती देण्याचा संकल्प करत भारतीय जनता पक्षाने आपली कार्यकारणीची घोषणा आज केली.  

नितीन नवीन यांच्या नेतृत्त्वात काम करण्यासाठी  भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीस पदांची घोषणा करण्यात आली आहे.

आज झालेल्या घोषणेनुसार माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागलेली आहे. मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्री पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे राष्ट्रीय महामंत्री व केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोषाध्यक्षपदी कायम असतील.सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रिती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.

 विशेष बाब म्हणजे 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत भाजपनं एका मुस्लीम नेत्याला स्थान दिलं आहे. नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एका मुस्लीम नेत्याला राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर संधी देण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन  नरेंद्रभाई दोशी, भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रा. एम नागराज, प्रा. तारिक मन्सूर, डॉ. मधुचंद्र कर

राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री)

विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती ईरानी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी, संजय भाटिया यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलं आहे. 

अशी माहिती भाजपाचे नितीन नबीन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख