Sunday, November 24, 2024

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’

Share

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे.

‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे.खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे !!

१९७७ मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. १९७८ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. १९८० मध्ये ४० आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८८ मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. १९९९ मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. २०१९ मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? अशा अनेक घटनांचे दाखले चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अन्य लेख

संबंधित लेख