Sunday, December 22, 2024

घटनात्मक पदावरील व्यक्तीने सातत्याने ‘भारतविरोधी वक्तव्ये’ करणेस्वीकारार्ह नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन.

Share

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाकारणारी आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची जवळपास 10 वर्षे अंमलबजावणी न होण्यास कारणीभूत असलेली मानसिकता, आरक्षणाविरोधात पूर्वग्रहदूषित मानसिकतेची जबाबदारी आता दुसऱ्याला देण्यात आली आहे आणि घटनात्मक पदावरील व्यक्ती परदेशी भूमीवर सातत्याने
‘भारतविरोधी वक्तव्ये करत आरक्षण समाप्त करण्याबद्दल बोलत आहे, हे अस्वीकारार्ह नाही, असे म्हणत उपराष्ट्र्पती जगदीप धनखड यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

ते काल मुंबईत संविधान मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हा चिंतेचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे आणि सखोल मंथनाचा विषय आहे! जी मानसिकता आरक्षणविरोधी होती, आरक्षणाविरुद्ध पूर्वग्रहदूषित होती तीच मानसिकता दुसऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. आज घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती परदेशात जाऊन म्हणते की आरक्षण रद्द केले पाहिजे. संविधान हे पुस्तकाप्रमाणे दाखवायचे नसते. संविधानाचा आदर केला पाहिजे. संविधान वाचायचे असते. संविधान समजून घ्यायचे असते. संविधानाला केवळ पुस्तक म्हणून दाखवणे, त्याचे प्रदर्शन करणे हे कुठलीही सभ्य व्यक्ती, सुसंस्कृत जाणकार व्यक्ती, संविधानाप्रती एकनिष्ठ भावना असणारी आणि संविधानाच्या भावनेचा आदर करणारी कोणीही व्यक्ती ते स्वीकारणार नाही.

संविधानानुसार आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले आहेत, आपल्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचाही समावेश आहे आणि सर्वात महत्वाची कर्तव्ये कोणती आहेत? संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज आणि
राष्ट्रगीताचा आदर करणे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करा आणि भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करा. मात्र हे किती विडंबनात्मक आहे की काहीचा परदेशी प्रवासांचा एकमेव उद्देश या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणे हा आहे. भारतीय राज्यघटनेच्या भावनेची सार्वजनिकरित्या चिरफाड करणे हा आहे, असे ते म्हणाले.

“खरे रत्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देऊन का गौरवण्यात आले नाही, 31 मार्च 1990 रोजी त्यांना ते देण्यात आले. हा सन्मान त्यांना यापूर्वी का देण्यात आला नाही? बाबासाहेब हे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. बाबासाहेबांच्या मानसिकतेशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंडल आयोगाचा अहवाल होय. हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील दहा वर्षांसाठी आणि त्या दशकात जेव्हा देशात दोन पंतप्रधान होऊन गेले, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी , तेव्हा या अहवालाबाबत कुणीही पुढाकार घेतला नाही,” असे ते म्हणाले.

आरक्षणविरोधी मानसिकतेकडे लक्ष वेधून धनखड म्हणाले, “मी या मानसिकतेबद्दल काही निरीक्षणे उद्धृत करू इच्छितो . देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, काय म्हणाले होते?

“मला कोणत्याही स्वरूपातील आरक्षण आवडत नाही. विशेषत: नोकऱ्यांमधील आरक्षण”. त्यांच्या मते आणि खेदाने आणि दुर्दैवाने मी उद्धृत करतो “अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि आपल्याला निकृष्टतेकडे नेणाऱ्या कोणत्याही निर्णयाच्या मी विरोधात आहे.”

जे आरक्षण संपवण्याच्या गप्पा मारतात आणि आरक्षण गुणवत्तेच्याविरोधात आहे असे मानतात, अशांवर टीका करताना धनखड यांनीअधोरेखित केले की, “मी तुम्हाला खात्री देतो की, आरक्षण हासंविधानाचा विवेक आहे, आरक्षण हे आपल्या संविधानातसकारात्मकतेसह, सामाजिक विषमता संपवून समता प्रस्थापितकरण्याचा मोठा अर्थ बाळगून आहे. आरक्षण ही सकारात्मक कृती आहे,ती नकारात्मक नाही, आरक्षण म्हणजे एखाद्याची संधी हिरावून घेणेनाही, आरक्षण म्हणजे,समाजाचे आधारस्तंभ आणि सामर्थ्यअसणाऱ्यांना हात देणे आहे

“बांग्लादेशसारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते” अशी विधाने करणे म्हणजे अराजकतेला निमंत्रण देणे आहे असे म्हणत, धनखड यांनी तरुणांना, आपल्या लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांवर समोरासमोर होणाऱ्या हल्ल्याला थारा न देण्याचे आवाहन केले. उपराष्ट्रपतींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले ते अधोरेखित केले, ” भारताने यापूर्वीही आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघातामुळे आणि अनैतिक कृत्यांमुळे आपले स्वातंत्र्य गमावले आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होईल का? भारतीय, देशाला आपल्या पंथापेक्षा श्रेष्ठ मानतील की पंथ देशापेक्षा श्रेष्ठ मानतील? पण एक निश्चित आहे की जर पक्षांनी पंथ देशापेक्षा श्रेष्ठ मानला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमवावे लागेल”.

असे आक्रीत घडू नये यासाठी आपण सर्वांनी काटेकोरपणे सावध राहिले पाहिजे. आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे, असेही धनखड पुढे म्हणाले.

राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री श्री मंगल प्रभात लोढा, राज्य सरकारच्या कौशल्य-रोजगार-उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सचिव श्री गणेश पाटील आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख