Saturday, December 21, 2024

फडणवीसांचा व्होट जिहादचा आरोप !

Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील कणेरी मठातील कार्यक्रमात
बोलताना गंभीर आरोप केला की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये ‘व्होट जिहाद’
घडला. त्यांनी यामध्ये हिंदुत्ववादी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी काही गटांनी एकत्रितपणे मत
दिल्याचा आरोप केला आहे.

धुळे आणि मालेगावच्या उदाहरणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, धुळ्यात विधानसभेत १.९
लाख मतांनी आघाडीवर असलेला उमेदवार मालेगावमध्ये १.९ लाख मतांनी पिछाडीवर गेला, त्यामुळे तो ४,००० मतांनी पराभूत झाला. फडणवीस यांनी हा मुद्दा उचलताना सांगितले की, या निवडणुकीतील
पराभवाबद्दल चिंता नाही, परंतु काही गटांनी संघटित मतदानाद्वारे हिंदुत्ववादी उमेदवारांना पराभूत
करण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे आणि हे धोकादायक आहे. याशिवाय, फडणवीस यांनी लव्ह
जिहादसंबंधी गंभीर विधानं केली. त्यांनी दावा केला की, १ लाखांहून अधिक लव्ह जिहाद प्रकरणं समोर
आली आहेत. हिंदू मुलींना फसवून लग्न करून त्यांना धोका दिला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या अमित
शाह यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ठाकरेंनी आरशात पाहण्याची गरज
आहे. कलम ३७० हटवून काश्मीरला भारताशी एकरूप करण्याचं ऐतिहासिक कार्य मोदी आणि अमित
शाह यांनी केलं असून हिंदू ओळख पुनर्स्थापित करण्याचे काम भाजपने केल्याचं त्यांनी नमूद केलं.

अन्य लेख

संबंधित लेख