Friday, October 25, 2024

शरद पवारांचा डाव: बारामतीत पवार वि. पवार!

Share

बारामती : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) च्या शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. शरद पवार गटाने पहिल्या यादीमध्ये एकूण 45 उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना रणनीतिकदृष्ट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) मैदानात उतरवले आहे. ते बारामतीतून त्यांचे काका आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्राला अजून एकदा बारामती मध्ये कौटुंबिक राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.

बारामतीतून उमेदवारी दिल्याबद्दल एससीपी नेते युगेंद्र पवार म्हणाले, “शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो. बारामतीच्या जनतेसाठी, सर्व समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील,” असे ते म्हणाले.

श्रीनिवास पवार यांचा मुलगा आणि शरद पवारांचा नातू 32 वर्षीय युगेंद्र पवार, शरद पवार यांच्या तालमीत तयार झाला आई. या महत्त्वपूर्ण राजकीय लढाईसाठी तयार केले आहे. त्यांची उमेदवारी केवळ वैयक्तिक आव्हानच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील व्यापक वैचारिक आणि राजकीय मतभेदाचेही प्रतीक आहे.

बारामतीतील ही निवडणूक केवळ कौटुंबिक निष्ठेचीच नव्हे तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय भांडवलाचीही परीक्षा घेणार आहे. शरद पवारांसाठी, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांच्या प्रभावाची ही लिटमस टेस्ट असू शकते, तर अजित पवारांसाठी, युती बदलण्याच्या दरम्यान त्यांचे राजकीय मैदान मजबूत करणे हे आहे. या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात यावर पण संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

ही निवडणूक केवळ बारामतीवर नियंत्रण कोणाचे आहे हे निश्चित करणार नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यावरही लक्षणीय परिणाम करेल, कौटुंबिक संबंध किंवा राजकीय विचारसरणी मतदारांच्या निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभाव पाडतात की नाही हे दर्शविते. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले असून, इतिहासाची पुनरावृत्ती होणार की पवार कुटुंबीय राजकारणात नव्या अध्यायाची साक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख