महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, २०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामागे शरद पवार यांच्या पत्राची महत्त्वाची भूमिका होती.फडणवीस म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, हे थेट शरद पवारांच्या पत्रामुळे घडलं. हे पत्र आमच्याच कार्यालयात तयार झालं होतं.” त्यांनी पुढे सांगितले की, या पत्रावर स्वाक्षरी होण्यापूर्वी पवारांनी काही बदल सुचवले होते.
“राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आम्ही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व शरद पवारांच्या सूचनेनुसारच ठरलं होतं,” असं फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, राज्यातील राजकीय स्थिरतेसाठी राष्ट्रपती राजवट हा एक होता आणि त्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली होती.हे वक्तव्य राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे आहे, कारण त्यात शरद पवारांची भूमिका अधिक स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या नाट्यमय क्षणांचा हा नवा अध्याय नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे.