Thursday, December 26, 2024

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक; शपथविधी आणि मंत्रिमंडळ वाटपावर चर्चा?

Share

मुंबई : महायुती (Mahayuti) आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पुढील महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेची रणनीती आखली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit pawar) या प्रमुख व्यक्तींचा समावेश होता.

राजधानीतील चर्चेनंतर महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची आज मुंबईत (Mumbai) आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आणि मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा होणार आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुती आघाडीने २८८ पैकी २३२ जागा जिंकत निर्णायक जनादेश मिळवला. या विजयानंतर, भाजपने युतीचे नेतृत्व करण्याची अपेक्षा केली आहे, बहुधा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असं दिसत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख