Monday, June 24, 2024

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी

Share

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Elections 2024) चे निकाल आज जाहीर होत असून, मतमोजणी सुरू झाली आहे. आता सुरुवातीचे ट्रेंडही देशभरातून येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अमित शाह यांचे नाव देशातील सर्वात हाय प्रोफाईल लोकांमध्ये समाविष्ट आहे. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा विजय प्राप्त केला आहे.

अमित शाह या जागेवर त्यांची स्पर्धा काँग्रेसच्या उमेदवार सोनल पटेल यांच्याशी होती. अमित शहा यांनी सोनल पटेल यांचा तब्बल 7 लाख 44 हजार 716 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. अमित शहा यांना 10 लाख 10 हजार 972 एवढी मतं मिळाली आहेत. तर, सोनल पटेल यांना 2 लाख 66 हजार 256 एवढे मतं मिळाली आहेत. या जागेवर एकूण 14 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी सोनल पटेल वगळता इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाल्याचे दिसत आहे. गांधीनगर जागेवर NOTA ला 22 हजार 005 मते पडली आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख