Tuesday, September 17, 2024

अनिल देशमुखांवर काल सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजनांचा आज धक्कादायक गौप्यस्फोट

Share

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून (CBI) काल गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा नेते गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर, आता खुद्द गिरीष महाजनांनी (Girish Mahajan) अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले कि, गिरीश महाजन यांनी या प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. “अनिल देशमुखांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कटकारस्थान करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला ही गोष्ट सत्य आहे. त्यावेळचे एसपी प्रवीण मुंडे गुन्हा दाखल करत नव्हते. ते महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली आणि 3 वर्ष 12 दिवसांनी जळगाव जिल्ह्यात 650 किलोमीटर अंतरावर निंबोऱ्यात गुन्हा कसा नोंदवायचा? यासाठी ते तयार नव्हते” असं ते म्हणाले.

मात्र, “अनिल देशमुखांनी पोलिस अधिक्षकांवर खूप दडपण आणलं. अत्यंत खालच्या भाषेत त्यांच्याशी बोलले. एसपी प्रवीण मुंडे माझ्याशी बोलले, त्यांनी मला सांगितलं, भाऊ माझ्यावर दडपण आणलं जातय. निलंबित करण्याची धमकी दिली जातेय” असा दावा गिरीश महाजन यांनी केला. “मी स्वत: या संदर्भात अनिल देशमुखांना भेटलो. ते म्हणाले मी हतबल आहे. माझ्यावर वरिष्ठांच दडपण आहे. माझ्यासमोर त्यांना विचारा, गिरीश महाजन तुम्हाला कितीवेळा भेटले? त्यांनी मला सांगितलं, माझ्यावर दडपण आहे, तुम्ही पवारसाहेबांना भेटून घ्या, तरच मी तुमची काही मदत करु शकेन” असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.

ते म्हणले, “अनिल देशमुख यांनी एकनाथ खडसे आणि शरद पवार यांचं नाव घेतलं. एकनाथ खडसे वारंवार शरद पवारसाहेबांकडे जाऊन बसायचे. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला” असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.

अन्य लेख

संबंधित लेख