Tuesday, August 18, 2026

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा: १७ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर

Share

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. या वर्षी देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मानला जाणारा ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ यंदा कोणत्याही खेळाडूला देण्यात आलेला नाही.


मात्र, विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या १७ खेळाडूंना प्रतिष्ठित ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासोबतच उत्कृष्ट मार्गदर्शकांसाठी (कोच) ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ आणि क्रीडा संवर्धनासाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे: राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

पुणे येथील ‘आर्मी पॅरालिम्पिक नोड’ या संस्थेला क्रीडा क्षेत्रातील संवर्धन आणि विकासासाठी दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय सैन्याने उभारलेली ही एक अत्यंत विशेष आणि समर्पित संस्था असून, ती दिव्यांग सैनिकांना (Disabled/Wounded Soldiers) आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरा-ॲथलीट म्हणून घडवण्याचे अभूतपूर्व कार्य करते. कर्तव्य बजावताना किंवा अपघातात अवयव गमावलेल्या जवानांना पुनर्वसित करून, त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे आणि त्यांना पॅरालिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांसाठी तयार करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

१. अर्जुन पुरस्कार
खेळाडूचे नावखेळ / प्रकार
तेजस्विन शंकरॲथलेटिक्स
मोहम्मद अजमल व्ही.ॲथलेटिक्स
प्रियंका गोस्वामीॲथलेटिक्स
त्रीसा जॉलीबॅडमिंटन
पुलेला गायत्री गोपीचंदबॅडमिंटन
विदित संतोष गुजरातीबुद्धिबळ (चेस)
दिव्या जितेंद्र देशमुखबुद्धिबळ (चेस)
नरेंद्रबॉक्सिंग
धनुष श्रीकांतडेफ़ नेमबाजी (Shooting)
अखिल शेरोननेमबाजी (Shooting)
लालरेमसियामीहॉकी
राजकुमार पालहॉकी
सुरजीतकबड्डी
पूजाकुस्ती
रुद्रांश खंडेलवालपॅरा-शूटिंग
एकता भ्यानपॅरा-ॲथलेटिक्स
अरविंद सिंगरोइंग (नौकानयन)
२. अर्जुन पुरस्कार – जीवनगौरव
खेळाडूचे नावखेळ
आय. अरुमायनायगमफुटबॉल
३. द्रोणाचार्य पुरस्कार
प्रशिक्षक / कोचचे नावखेळ
परवीर सिंगॲथलेटिक्स
छोटे लाल यादवबॉक्सिंग
नेहा नंदकुमार चव्हाणनेमबाजी
धर्मेंद्र सिंग यादवबॉक्सिंग
वीरेंद्र कुमारकुस्ती

अन्य लेख

संबंधित लेख