Tuesday, September 17, 2024

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल

Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही जी घटना घडली अत्यंत दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायी आणि मनात संताप निर्माण करणारी घटना आहे. हा एक अपघात होता याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. आजही पुन्हा माफी मागतो, या प्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व चौकशा होतील आणि कारवाई सुध्दा होईल, यामध्ये सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. पुन्हा उत्तम दर्जाचे स्मारक उभे ही करण्यात येईल, असे आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. “अपघात आणि घटनेच्या प्रतिक्षेवर उभी असलेली उबाठा सेना ही राजकीय गिधाडाची वृत्ती आहे,” अशी टीका शेलार यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी काल मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एखादी व्यक्ती मरते का आणि आपल्याला खायला मिळते का… याची वाट पाहत गिधाडे बसलेली असतात तशीच राजकीय गिधाडी वृत्ती उबाठाची आहे. आपण स्वत: काही करायचे नाही पण एखादी घटना, दुर्घटना घडली की त्यावर राजकीय पोळी भाजण्याचे काम उबाठा करते, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी प्रतीत्तर दिले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख