Friday, September 13, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी: दोन केंद्रीय मंत्र्यांची प्रभारीपदी नियुक्ती

Share

दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तयारीत भारतीय जनता पक्षाने कोणतीही कसर सोडायची नाही असे ठरविलेले दिसते. पक्षाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर (Maharashtra, Haryana, Jharkhand and Jammu and Kashmir) या प्रमुख राज्यांसाठी राज्य निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय नेत्यांची नियुक्ती केली आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) आणि अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांची महाराष्ट्रासाठी अनुक्रमे राज्य निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) आणि माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांची राज्य निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे झारखंडचे राज्य निवडणूक प्रभारी असतील, तर आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमा (Dr.Himanta Biswa Sarma) यांची राज्य निवडणूक सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार, जम्मू-काश्मीर राज्यात सुद्धा निवडणूका होणार आहेत. पक्षाने केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांच्याकडे जम्मू-काश्मीरच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.

आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी भाजप नवनिर्वाचित खासदार, आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेत आहे. पक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचे विश्लेषण करत आहे आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे त्याचे नियोजन करत आहे.

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्याने भाजप तयारीत कोणतीही कसर सोडत नाहीये. आगामी निवडणुकीत जोरदार मुकाबला करून विजयी होण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख