Monday, June 24, 2024

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी

Share

जळगाव लोकसभा : भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार (karan Pawar) यांना उमेदवारी दिली होती.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानांतर भाजपचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी बंड पुकारले. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून मोदींच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहेत यावर मत मागितली गेली. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना 6 लाख 74 हजार 428 मतं पडली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना 4 लाख 22 हजार 834 एवढी मतं मिळाली. भाजपच्या स्मिता पाटील यांनी तब्बल 2 लाख 51 हजार 594 एवढ्या मतांनी मविआ उमेदवार करण पवार यांचा दारुण पराभव केला.

अन्य लेख

संबंधित लेख