Sunday, February 16, 2025

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार?

Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधा, बेस्टसाठीचे अनुदान आणि कररचनेतील संभाव्य बदल याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

पायाभूत सुविधांवर भर
महापालिकेने शहरातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिन्या आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. तसेच, सध्याच्या कर दरांमध्ये सुधारणा होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष आहे. देशाच्या आर्थिक राजधानीची महापालिका ही सर्वात श्रीमंत मानली जाते, त्यामुळे या अर्थसंकल्पाची विशेष महत्त्व आहे.

बेस्टसाठी किती निधी मिळणार?
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमासाठी या अर्थसंकल्पात किती निधी मिळणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. बेस्टने 2025-26 साठी 9439 कोटींचा अर्थसंकल्प तयार केला असून, त्यात 2132 कोटी रुपयांची तूट दर्शवली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. नवीन बस खरेदी आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी पालिकेकडून मोठ्या अनुदानाची अपेक्षा आहे. मात्र, महापालिका प्रशासन किती निधी मंजूर करणार, यावरच बेस्टच्या आर्थिक व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून असेल.

पहिल्यांदाच आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प
महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे आज सकाळी 11 वाजता पालिका मुख्यालयात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबईकरांसाठी कोणत्या नव्या घोषणा होणार? बेस्टला किती अनुदान मिळणार? आणि पायाभूत सुविधांसाठी किती मोठी तरतूद केली जाणार? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.

अन्य लेख

संबंधित लेख