Friday, October 25, 2024

मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे सव्वा कोटी ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हातारपण, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये संरक्षण मिळेल आणि त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होईल. या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असेल आणि महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी इतके असेल.

अन्य लेख

संबंधित लेख