Saturday, July 27, 2024

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी

Share

अमरावती लोकसभा : उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान निकालापूर्वी भाजपा आणि एनडीए ला बहुमत दिसत असल्याचं एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलंय. तसंच अमरावतीमध्ये (Amravati) सुद्धा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या एका वक्त्यव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहे. अमरावतीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास सिव्हिल वार होईल, असे त्या म्हणाल्या.

“लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात कल मतमोजणी दरम्यान दिसून येईल. चार तारखेला अमरावती चा खासदार हा पंजावर निवडणूक लढवणारा महाविकास आघाडीचा निवडून येतो आहे. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, जर असा निकाल लागला नाही तर सिव्हिल वार होईल” असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

“काँग्रेसकडून हताशपाने महारष्ट्रात दंगे भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशोमती ठाकूर यांच्या सारख्या महिला लोकप्रतिनिधी जर अशाप्रकारे धमक्या देत असतील, तर ते योग्य नाही”, असे रवी राणा म्हणाले. तसेच “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई केली पाहिजे”, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख