Monday, October 7, 2024

‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’

Share

महाराष्ट्र : भाजपा (BJP) नेते तथा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. पाटील म्हणाले होते, मविआ सरकारच्या काळात कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अटक झाली असती. मविआ सरकारच्या काळात ३३ महिने आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय.

एकनाथ शिंदे म्हणाले, मला त्याबाबत अशी माहिती आहे की, महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर भाजपा नेते आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरांना खोट्या केसेसमधे अडकवून त्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचल होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाचे आमदार फोडण्याचाही काटही त्यांनी रचला होता, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा…

अन्य लेख

संबंधित लेख