Saturday, July 27, 2024

३ दिवसात बिनाशर्त माफी मागा, अन्यथा..; एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३ दिवसात बिनाशर्त माफी मागण्यास आपल्या वकीलामार्फत सांगितले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असे सांगितले आहे. सामना या वृत्तपत्रातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाणूनबूजून प्रतिमेस धक्का लागेल असे विधान केले होते. त्यामुळेच राऊतांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून ‘रोखठोक’ या सदराखाली त्यांनी लेख लिहून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रुपये वाटले. मतदारसंघातील उमेदवार पाडण्यास वेगळे बजेट होते. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले. असा दावा संजय राऊत यांनी दि. २६ मे २०२४ रोजी सामनाच्या रोखठोक ह्या सदरात केला होता.

अन्य लेख

संबंधित लेख