Wednesday, December 4, 2024

AI वाढवणार Google Maps ची अचुकता

Share

Google Maps ने नेव्हिगेशन चा वापर आणखी सहज आणि चांगला करण्यासाठी AI चा उपयोग करून खास भारतातील लोकांसाठी तयार केलेल्या नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहे. अरुंद रस्ते, उड्डाणपुलांमधून नेव्हिगेट करणे आणि इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन शोधणे यासह भारतातील ड्रायव्हर्स आणि पादचाऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अपडेट्सची रचना केली आहे.

मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे AI वर चालणारे नेव्हिगेशन अरुंद रस्ते जे गाडी चालविण्यासाठी असुरक्षित आणि अडचणीचे ठरतात ते टाळण्यास मदत करते.आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे फ्लायओव्हर कॉलआउट वैशिष्ट्य, जे पूढील येणाऱ्या फ्लायओव्हर्ससाठी स्पष्ट दिशा सांगते. हे वैशिष्ट्य भारतातील 40 शहरांमध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी उपलब्ध आहे,या वैशिष्ट्याचा अधिक शहरांमध्ये विस्तार करण्याची आणि भविष्यात iOS उपकरणांसाठी सादर करण्याची योजना आखत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरला समर्थन देण्यासाठी, Google Maps ने EV चार्जिंग स्टेशनची माहिती एकत्रित केली आहे. कंपनीने 8,000 हून अधिक चार्जिंग स्टेशनसाठी अधिकृत माहिती जोडण्यासाठी प्रमुख EV चार्जिंग कंपनीसोबत भागीदारी केली आहे

नेव्हिगेशन सुधारणांसोबतच, Google Maps ने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) आणि नम्मा यात्री यांच्या भागीदारीद्वारे कोची आणि चेन्नईमध्ये मेट्रो तिकीट बुकिंग सुरू केली आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना Google Maps द्वारे थेट मेट्रो तिकिटांचे बुकिंग करू शकतात.

वापरकर्त्यांना नवीन ठिकाणे शोधण्यात आणि त्यांचा परिसर एक्सप्लोर करण्यात मदत करण्यासाठी, Google Maps ने NDTV Food आणि Magic Pin सारख्या स्थानिक तज्ञांसह भारतातील 10 प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळांमध्ये खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांची माहिती दिली आहे

ही नवीन वैशिष्ट्ये नेव्हिगेशन सुधारण्यासाठी AI चा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करून, भारतातील वापरकर्त्यांसाठी Google maps अधिक उपयुक्त कारण्यंसाठी उचलेला पाऊल आहे

अन्य लेख

संबंधित लेख