Sunday, October 13, 2024

काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का?

Share

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात गणेशोत्सवाच्या उत्सव आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे. काँग्रेस (Congress) व त्यांच्या इकोसिस्टीमने नवा वाद निर्माण केला आहे. ‘आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणरायाची व महालक्ष्मीची पूजा व आरती काय केली, आख्ख्या काँग्रेस व इकोसिस्टीमच्या गोटात आगडोंब उसळला आहे,” अशी खरमरीत टीका महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

चंदशेखर बावनकुळे ‘एक्स’ वर पोस्ट करत काँग्रेस वर जोरदार प्रहार केला आहे, “काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का??? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जेव्हा जेव्हा हिंदू व हिंदूंचे सण या देशात आनंदाने व उत्साहाने साजरे होतात तेव्हाच त्यात खुसपटं काढण्याचे काम काँग्रेस व इकोसिस्टीम करत असते.” अशी कडवी टीका त्यांनी केली.

“आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणरायाची व महालक्ष्मीची पूजा व आरती काय केली, आख्ख्या काँग्रेस व इकोसिस्टीमच्या गोटात आगडोंब उसळला आहे. जेव्हा यापूर्वीचे पंतप्रधान आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या द्यायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे तेव्हा ही मंडळी झोपली होती का? आणि यांना हिंदू आणि विशेषतः मराठी माणसांच्या सण समारंभालाच बरी जाग आली.” अशी चपराक बावनकुळे यांनी लगावली.

“सध्याचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे आहेत, ही सर्वच मराठी माणसांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्याकडे विराजमान असलेल्या बाप्पाच्या पूजा व आरती करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी जाणे, हा आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे. पण, महाराष्ट्राचा, मराठी माणसांचा, हिंदूंचा आनंद काँग्रेस व इकोसिस्टीमला कसा देखवेल?,” असा आरोप त्यांनी केला.

“या इकोसिस्टीमने काहीही निरर्थक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील व देशातील सुज्ञ जनता यांच्या नालायकपणाला बधनार नाही. गणपती ही बुध्दीची देवता आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाकडे माझे मागणे आहे की, हे गणराया या काँग्रेस व इकोसिस्टीमला सर्व सामान्यांच्या आनंदात सहभागी सुबुद्धी दे!,” अशी आशा व्यक्त त्यांनी केली.

अन्य लेख

संबंधित लेख