भाजप (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेअध्यक्षा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून,काँग्रेसच्या मराठी माणसावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. वाघ यांनी ट्विटरवर काँग्रेसला लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत म्हटले की, बलात्कार करणारा आरोपी कोणत्याही जात, धर्म, भाषा, किंवा प्रांताशी संबंधित नसतो, मात्र काँग्रेसने मराठी माणसाबद्दल आपल्या मनातील आकस उघड केला आहे.
वाघ यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी टीव्ही डिबेटमध्ये केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. शर्मा यांनी “मराठी माणूस बदलापूरमध्ये बलात्कार केला तर, तुम्ही त्यालाही वाचवलं का?” असा सवाल उपस्थित करत मराठी माणसांवर टीका केली होती. यावर वाघ यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला करत, “मराठी माणसाने बलात्कार केला असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही? हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा,” असे ट्विट केले. भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला पुनावालाही या प्रकरणात काँग्रेसवर निशाणा साधत, “अलोक शर्मा यांनी मराठी माणसांचा अपमान केला आहे आणि मी याची समस्त मराठी जनेकडून तीव्र आक्षेप घेतो” असं ते म्हणाले.
- हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट
- ‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात
- महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता
- राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
- महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही