Wednesday, December 4, 2024

‘कमळाचं बटण दाबा, नापाक इरादे गाडा’; सज्जाद नोमानी यांचे भाषण ऐकवत फडणवीसांनी मांडले राजकीय ध्रुवीकरणाचे मुद्दे

Share

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवार भिमराव तापकीर यांच्यासाठी खडकवासला पुणे (Khadakwasla, Pune) येथे एका सभेला उपस्थित राहून संबोधित केले. जेथे त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांच्या भाषणातील क्लिप प्ले करून राजकीय ध्रुवीकरणाचा मुद्दा विशेषत: मांडला.

ही साधी निवडणूक नाही, व्होट जिहाद करत महाविकास आघाडीचे सिपहसालार उलेमांचे तळवे चाटत आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीसाठी केलेल्या आवाहनाची रेकॉर्डिंग यावेळी ऐकवली. तसेच आपल्या पुढील पिढीच्या सुरक्षित भविष्याकरिता कमळाचे बटण दाबा आणि नापाक इरादे गाडून टाका असे आवाहन आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला लढावं लागेल. आपण आता एक राहिलो तरच सेफ राहू. एक असू तर सुरक्षित आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे. ह्यांचे विचार केवळ महाराष्ट्र नाही तर दिल्ली सरकार हलवायचे आहे. हे छोटे विचार घेऊन आलेले नाहीत. हे या देशाला अस्थिर करण्याचं काम करत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी सामील झाली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणले, भिमराव आण्णा यांच्याकरता पुन्हा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात आपले सरकार आले, त्यानंतर पुण्याचा चेहरा बदलण्याचे काम वेगाने सुरु झाले. पुण्यातील सर्वात मोठी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आपण मेट्रोचे काम सुरु केले. मेट्रोचा विस्तार वेगाने करण्यासाठी ‘महा-मेट्रो’ ही स्वतंत्र कंपनी आपण स्थापन केली. देशात सर्वात वेगाने एखाद्या मेट्रोचे काम झाले ते पुणे मेट्रोचेच!

‘चांदणी चौक उड्डाणपुला’साठी सातत्याने भिमराव आण्णा पाठपुरावा करत होते. मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी साहेबांच्या नेतृत्वात त्या पुलाचे एक उत्तम डीपीआर तयार झाले. चांदणी चौकातील उड्डाणपुलाची ‘इंजिनिअरिंग मार्वल’ म्हणून गणना होते. पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी आपण पुणे ‘रिंग रोड’चे काम सुरु केले आहे. ‘रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम’द्वारे आपण ही अडचण कायमस्वरुपी सोडवणार आहोत.

पुण्यात तसेच खडकवासलामध्ये सर्वसामान्यांना परवडणारे घर मिळावे, यासाठी आपण एसआरएसंबंधीचे अनेक नियम बदलले. शहराला झोपडपट्टीमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. वाढत्या शहरीकरणाला आकार देण्यासाठी ‘पुणे महानगर विकास प्राधिकरण’ अर्थात ‘पीएमआरडीए’ची स्थापना आपण केली. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख