Tuesday, September 17, 2024

नेपाळ बस अपघातातील जखमी प्रवाशांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Share

मुंबई : नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळल्याच्या घटनेत महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाऊन विचारपूस केली. यावेळी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

या 7 जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा त्यांना भेटून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. उद्या आणखी 4 जखमींना मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. तसेच, राज्य सरकारतर्फे या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, विधी व न्याय विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अन्य लेख

संबंधित लेख