सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय.
या दुर्घटने बाबतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि मालवणच्या समुद्रोकेनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारांना तसेच नौदलाला तेथील सोसाट्याचा वारा आणि हवेत लोखंड किती गंजते, याचे आकलन झाले नसावे, पुतळा कोसळल्याच घटना दुःखदायक असून त्यामुळे वेदना झाल्या. पण त्यावरून जे राजकारण सुरू आहे, ते अधिक वेदनादायी आहे.
या घटनेमुळे राज्यात तीव्र संत व्यक्त करण्यात येत असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करीत सरकारच्या राजीनाम्याची मागण केली आहे. हा पुतळा राज्य सरकारने उभारलेल नव्हता. तो नौदलाने चांगल्या हेतूने हा पुतळा उभारला होता. आम्ही नौदलाच्या मदतीने याही पेक्षा मोठा पुतळा पुन्हा उभारु. यावरुन कोणीरह्ह राजकारण करु नये, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले
यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.