Thursday, October 10, 2024

बाईईईईई!!!! देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयावर हल्ला करणारी महिला माथेफिरू!!!

Share

मुंबई – काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालवर हल्ला करणारी महिला ही मनोरूग्ण आहे. याआधीही ती बऱ्याच वेळा मंत्रालयात आलेली आहे. मुंबई मधल्या दादर भागात ती राहते. याआधी तिने भाजप कार्यालयात जाऊनसुध्दा तिने धमकी दिली होती. त्यावेळी तिची रीतसर तक्रार याआधी भाजपा कार्यालयाने केली होती.

ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे पण ती असे उद्योग करतानाचे व्हिडियो समोर आले आहेत. लोकांच्या दारावर झाडूने मारणे, दारे आपटणे, कॅमेरा तोडणे असे उद्योग ती सातत्याने करते. यापूर्वी तिने अनेक राजकीय नेत्यांना फोन करून सलमान खानचा नंबर द्या अशी मागणी केली आहे. वास्तविक ही महिला मनोरूग्ण आहे असे दिसते आहे.

नक्की काय घडलं ?

मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्यात. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली.

अन्य लेख

संबंधित लेख