Wednesday, December 4, 2024

धनगर क्रांती सेना महासंघाचा महायुतीला जाहीर पाठींबा

Share

महाराष्ट्रातील धनगर क्रांती सेना महासंघाने महायुतीला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयाची घोषणा महासंघाच्या अध्यक्ष श्री. भरत महानवर यांनी केली. हा पाठिंबा देतेवेळी महासंघाच्या हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत एक मेळावा आयोजित करण्यात आला होता.धनगर क्रांती सेना महासंघाच्या वतीने, पाठींबा देण्याचे पत्र महायुतीच्या नेतृत्वाला सादर करण्यात आले. या प्रसंगी बोलताना अध्यक्ष भरत महानवर म्हणाले, “आमच्या समाजाच्या विकासाच्या आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही महायुतीच्या विचारसरणीला पाठिंबा देत आहोत. आमच्या समाजाच्या उत्थानासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

या पाठींब्यामागे धनगर समाजाच्या विविध मागण्या आहेत, ज्यात शिक्षण, रोजगार, आणि आरक्षणाचे प्रश्न मुख्य आहेत. धनगर समाजाची अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशन ही एक मोठी मागणी आहे, जी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. या मागण्यांना पूर्ण करण्याची आशा महासंघाला महायुतीकडून आहे.या प्रसंगी गुजरात सरकारच्या पशु संवर्धन आयोगाचे अध्यक्ष श्री. अर्जुनजी रबारी यांनी देखील आपले मत व्यक्त केले, “धनगर समाज आपल्या हक्कांसाठी एकत्र आला आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही आपल्या अधिकारांची प्राप्ती करू.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा पाठिंबा महायुतीला मोठा फायदा करून देऊ शकतो, विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम विभागात जिथे धनगर समाजाचे मोठे प्रमाण आहे. यामुळे येत्या निवडणुकांमध्ये महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो.ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात एक मोठा बदल घडवून आणणारी आहे

अन्य लेख

संबंधित लेख