Thursday, October 10, 2024

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी

Share

मुंबई : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी या पथकाला कारवाई करण्यापासून अडवलं. तसेच बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर देखील दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी या मशिदीच्या संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र कारवाईला स्थगिती दयावी, अशी विनंती वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे एकनाथ शिंदेंना केली होती.

या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवाय मशिदीवरील कारवाई रोखण्यासाठी धारावीत मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळत आहे. धारावील वाढता तणाव पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. लोक धारावीतील रस्ता अडवून बसले आहेत. तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस लोकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख