Sunday, May 26, 2024

या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

कल्याण लोकसभा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभामधून (Kalyan Lok Sabha) उमेदवारी दाखल केली. शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोड शो दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो, मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. ही रॅली ही विजयाची रॅली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हल वर काम करा. कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत सगळे रेकॉर्ड मोडले जातील. पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होईल. विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची ५ वर्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तुमची सेवा करेल’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख