Sunday, November 24, 2024

निवडणूक खर्चाची होणार 3 वेळा पडताळणी

Share


5 नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी तब्बल ३ वेळा केली जाणार आहे. या श्रृंखलेतील पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ७, ११ व १५ नोव्हेंबरला उमेदवारांचा खर्च पडताळून पाहिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या वेळांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले हे आहे.

निवडणुकीसाठी शासनाने पाठवलेले खर्चविषयक निरीक्षक वेकन्ना तेजावथ आणि डॉ. उमा माहेश्वरी तसेच त्या-त्या मतदारसंघासाठी नेमलेले सामान्य निरीक्षक हे प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या समक्षच ही पडताळणी केली जाईल. बरेचदा उमेदवारांनी प्रचार यंत्रणेवर केलेला खर्च एकतर लपवला जातो किंवा तो बाजारभावाच्या तुलनेत कमी दर्शवला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात झालेला खर्च अधिक असतानाही उमेदवारांनी दर्शवलेला खर्च कमी दिसतो. हेच नंतर उमेदवारासाठी अडचणीची ठरते.

त्यामुळेच निरीक्षकांच्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली जात आहे. या क्रमात पहिली पडताळणी ७ नोव्हेंबरला, दुसरी पडताळणी ११ ला तर तिसरी पडताळणी १५ नोव्हेंबरला केली जाणार आहे. तशा सूचना सर्व उमेदवारांना देण्यात आल्या असून, सर्व आठही मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यासाठीची तयारी केली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २४६ उमेदवार असून, ४ नोव्हेंबरच्या माधारीअंती ही संख्या त्याहून कमी होणार आहे

अन्य लेख

संबंधित लेख