Tuesday, December 3, 2024

महाराष्ट्राला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा उत्कृष्टता पुरस्कार

Share

केंद्र शासनाच्या कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत देशातील विविध राज्ये आणि बँकानी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी साठी AIF Excellance Award ने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली इथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक  प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला,आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे.

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सदर पारीतोषकाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातर्फे सदर पुरस्कार पुण्यातील कृषी संचालक अशोक किरनळी यांनी स्वीकारला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत २ कोटी मर्यादेपर्यतच्या योजने अंतर्गत पात्र सर्व कृषि पायाभूत सुविधा निधी कर्जावर वार्षिक ३ टक्के व्याज सुट आहे. सदर  सवलत ही जास्तीत जास्त ७ वर्षापर्यत उपलब्ध आहे.तसेच पात्र कर्जधारकांसाठी सुक्ष्म व लघु उद्योजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्ट अंतर्गत २ कोटी पर्यंतच्या कर्जासाठी या वित्त पुरवठा सुविधेतुन पत हमी संरक्षण उपलब्ध आहे, या संरक्षणाकरीता लागणारे शुल्क शासनामार्फत भरण्यात येते. शेतकरी उत्पादक संस्थेकरीता कृषि तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली,विभागाच्या अधिनस्त असलेल्या लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राबविण्यात येणा-या पतहमी योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्रासाठी वर्ष २०२५-२६ पर्यंत एकूण रु.८४६० कोटीचा लक्षांक आहे. महाराष्ट्रात येत्या ३१ ऑगस्टअखेर सदर योजने अंतर्गत विविध बँकांनी ८३५३ प्रकल्पासाठी ६११७ कोटी रुपये कर्ज मंजूर केलेले आहे.त्यापैकी ७१०८ प्रकल्पांना ३३०७ कोटी कर्ज वाटप केलेले आहे. सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मा.आयुक्त कृषि श्री.रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्तरावर कृषी पायाभूत सुविधा निधी कक्ष अशोक किरनळी यांच्या स्तरावर कार्यरत  आहे.

अन्य लेख

संबंधित लेख