Friday, September 20, 2024

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Share

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटी माहिती प्रसारित करुन शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय न्याय संहिता 353(2) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा जीआर आणि एक पोस्ट शेअक करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. यामध्ये त्यांनी “आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक’लाडकी बहीण’ चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना?, शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला”, अशी पोस्ट शेअर केली होती.

अन्य लेख

संबंधित लेख