Thursday, October 10, 2024

गांधीजींचे अनुयायी असाल तर काँग्रेसचे विसर्जन करा : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला

Share

मुंबई : तुम्ही खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि काँग्रेसचं काम संपलंय. आता काँग्रेसचं विसर्जन करायला हवं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर केली आहे. धर्मादाय कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग व डिजिटायजेशन प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“महात्मा गांधीजींनी दिलेल्या सुचना विरोधकांनी अंमलात आणायला हव्या. गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, स्वातंत्र्य मिळालं आहे आणि काँग्रेसचं काम संपलंय. आता काँग्रेसचं विसर्जन करायला हवं, अन्यथा काँग्रेस देशाच्या प्रगतीत बाधा आणेल. गांधीजींच्या या सुचनेचं जर विरोधक पालन करत असतील तरच त्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

“खार म्हणजे गांधी जयंती हा आंदोलनाचा दिवस नाही. या दिवशी शांतपणे बसून गांधीजींच्या विचारांवर आणि त्यांच्या कार्यक्रमांवर आत्मचिंतन करायला हवं. परंतू, विरोधक गांधीजींच्या नावाचा राजकीय उपयोग करतात. पण तुम्ही जर खरंच गांधीजींचे अनुयायी असाल तर त्यांची सूचना मान्य करा,” असे ते म्हणाले.

“धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि दुर्बल घटकांच्या पेशंटसाठी आरक्षित बेड असतात. परंतू, यातील जवळपास ७० ते ८० टक्के बेड रिकामे असतात. कारण त्याची माहिती नसते. त्यामुळे या अधिवेशनात कायदेशीर तरतूद करून हे सगळे बेड पारदर्शी पद्धतीने सांभाळण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. त्यासंदर्भात आज एक पोर्टल तयार केलं आहे. सर्व आरक्षित बेडची माहिती या पोर्टलवर असेल आणि कुठल्याही गरिब आणि गरजू रुग्णाला पारदर्शी पद्धतीने त्याचं वाटप होईल. कोणीही अशाप्रकारे बेड रिकामे ठेवू शकणार नाही,” असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख