महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पांडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरण आणि शेअर मार्केट मॅनेजमेंट घोटाळ्यासाठी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत
संजय पांडे यांच्यावर २००९ ते २०१७ दरम्यान एनएसईच्या कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी एका कंपनीच्या माध्यमातून अनधिकृतरित्या सेवा दिल्याचा आरोपही आहे. या आरोपांमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.