Sunday, October 13, 2024

शरद पवार ‘मिनी औरंगजेब’; नामांतर मुद्द्यावर गोपीचंद पडळकरांचा घणाघाती प्रहार

Share

पुणे : ‘शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. मिनी औरंग्या आहे. त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावडींना यामध्ये औरंगजेबाचे कही गुण दिसत असतील, म्हणून त्यांनी तिथे घोषणा केल्या असेल,’ असा घाणघात भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगरला गेले आहेत. ते गाडीतून उतरत असताना तिथे काही खऱ्या औरंग्याच्या पिलावडी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच नाव पाहिजे, अहिल्यानगर नको. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की वर्षभरापासून नामांतराचा विषय सुरु आहे. मे २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करु आणि त्यांनी केलं, मंत्रिमंडळात निर्णय झाला, केंद्रात पाठवला. केंद्र रेल्वे आयोगाची मंजुरीही आली. पोस्टाचीही येईल.

पडळकर पुढे ते म्हणाले, वर्षभरात कुठल्याही व्यक्तीने, इतके नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगरला आले, कार्यक्रम झाले, तिथे कोणीही मागणी केली नाही. आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करत आहेत. हा मिनी औरंगजेब आहे, असं माझं म्हणणं आहे. शरद पवार हे मिनी औरंगजेब आहेत. मिनी औरंग्या आहे. त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावडींना यामध्ये औरंगजेबाचे कही गुण दिसत असतील, म्हणून त्यांनी तिथे घोषणा केल्या असेल.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

धरगरांचं वाट्टोळ करायचं असेल, तर महाराष्ट्रातील शेंबड्या पोरांनाह माहितीये, याला परफेक्ट सोल्यूशन काय तर शरद पवार. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून त्यांनी तिथे घोषणा दिल्या. महाराष्ट्रातील सर्व अहिल्याभक्तांना माझी विनंती आहे, हे काय चाललंय बघा. यांना महाराष्ट्रात दंगली पेटवायच्या आहेत. सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावर उतरलेला दिसेल, असा इशाराही पडळकरांनी यावेळी दिला.

अन्य लेख

संबंधित लेख