Friday, January 17, 2025

खरगे यांच्या ट्रस्टला जमीन कशी मिळाली…?

Share

कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (KIADB) बंगळुरूजवळील हाय-टेक डिफेन्स एरोस्पेस पार्कमध्ये सिद्धार्थ विहार ट्रस्टला पाच एकर जमीन दिली आहे. सिद्धार्थ विहार ट्रस्ट हे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि त्यांचे कुटुंब चालवतात. या ट्रस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे, त्यांची पत्नी राधाबाई, मुलगा प्रियांक खरगे, जावई राधाकृष्ण दोड्डामणी आणि धाकटा मुलगा राहुल खरगे यांचा समावेश आहे. राज्यातील सत्तेचा गैरवापर करून खरगे यांनी ही जमीन घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. कर्नाटकात खरगे यांच्या ट्रस्टला जमीन देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे म्हणाले, ‘येथे आम्ही सीए साइट विकत घेत आहोत, आम्ही कोणतीही सबसिडी किंवा पेमेंटमध्ये विलंब किंवा काहीही बेकायदेशीर मागितले नाही. यात काय बेकायदेशीर आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमिनीशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) अधिकृत परवानगी दिली. सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमिनीच्या नुकसानभरपाईसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. खरगे यांचा विश्वास सार्थ होता, नियमानुसार काम केले आहे असे सिध्दरामय्या खरगे यांचा बचाव करताना म्हणाले. 

अन्य लेख

संबंधित लेख