Saturday, October 12, 2024

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ

Share

मुंबई : वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे. राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात वाढ केल्यामुळे आता राज्यातील ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन हे अन्य राज्यातील कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वांत जास्त आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी. ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. याबद्दल कंत्राटी कामगार संघटनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु, खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या आंदोलनात मारामारी, पॉवर स्टेशन बंद पाडणे आदी बाबी राज्य सरकारला मान्य नाहीत. त्यामुळे ज्या कंत्राटी कामगारांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशा कंत्राटी कामगारांबाबत विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले.

अन्य लेख

संबंधित लेख