Tuesday, September 17, 2024

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना

Share

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनधन खाते ही संकल्पना राबवण्यात आली. आणि आज या योजनेला भरभरून यश मिळत आहे.प्रधानमंत्री जनधन योजनेला १० पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लाभार्थी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या सर्वांचं केलं अभिनंदन.जन धन योजना करोडो देशवासियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आणि त्यांना सन्मानानं जीवन जगण्याची संधी देण्यात यशस्वी ठरली.

जन धन, आधार आणि मोबाईलविषयीची दूरदृष्टी ही आगामी काळात अनेक उपक्रमांना मुलभूत ठरणार आहे. माझ्या मते जन धन, आधार आणि मोबाईल (जाम) म्हणजे जास्तीत जास्त बाबी साध्य करणे होय.
खर्च झालेल्या प्रत्येक पैशाचे कमाल मूल्य
गरीबांचे व्यापक प्रमाणात सबलीकरण
सामान्य जनतेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर.
-श्री नरेंद्र मोदी

वर्ष 2014 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री जनधन योजना #PMJDY देशातील वित्तीय परिदृश्य यशस्वीरित्या बदलत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी वित्तीय सेवेची पोहोच सुनिश्चित करत आहे. २०१४ मध्ये मात्र, तत्कालीन रालोआ सरकारने या परिघाबाहेरील भारतीयांना औपचारिक आर्थव्यवस्थेत समाविष्ट करून घेण्याचे आव्हानात्मक कार्य हाती घेतले. ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ सुरू करण्यात आली आणि तिला नेत्रदीपक यश लाभले. १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत, या योजनेअंतर्गत एकूण ५३ कोटी १३ लाख लाभार्थी असून त्यांच्या खात्यांत दोन लाख ३१ हजर कोटी रुपये जमा आहेत. यापैकी सुमारे ३० कोटी लाभार्थी महिला आहेत.

प्रधानमंत्री जनधन योजनेने महिलांना त्यांची स्वत:ची बँक खाती असणे आणि त्या खात्यात त्यांचे स्वत:चे पैसे असणे यासाठी सक्षम केले आहे. या आर्थिक स्वातंत्र्याचे मूल्यमापन करणे अवघड असले तरी ते अतिशय महत्त्वाचे आहे. भारतीय महिलांचा नैसर्गिक कल बचत करण्याकडे अधिक आहे आणि या सवयीमुळे कालांतराने कुटुंबाच्या वित्तीय सुरक्षेला अधिक मजबुती प्राप्त होऊ शकते. याची परिणती म्हणून राष्ट्राचा बचतीचा दरदेखील वाढतो.


सर्वसामान्य लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नागरिकांना विमा आणि निवृत्तीवेतनासारख्या सुविधा पुरवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत प्रतिमाह केवळ 12 रुपये जमा करुन दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळवण्याची सुविधा आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमच्या योगदानावर आधारीत महिना रुपये 5,000 पर्यंत निवृत्तीवेतन मिळते. आतापर्यंत 9.2 कोटीपेक्षाही जास्त लोकांनी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे, तर सुमारे तीन कोटी लोक प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी झाले आहेत. तर सुमारे 15.85 लाख लोकांनी अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली आहे.

#10YearsOfJanDhan
#FinancialInclusion

अन्य लेख

संबंधित लेख