Thursday, January 16, 2025

कालिदास कोळंबकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

Share

मुंबई : महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला प्रारंभ झाला आहे. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Eknath Shinde and Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र विधानसभेचे (Maharashtra Legislative Assembly) हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राजभवनात त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली, ज्यामुळे राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरू आहे.

येत्या ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबईत तीन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. हंगामी अध्यक्षाची नियुक्ती ही शपथविधी पार पाडण्यासाठी केली जाते, आणि कालिदास कोळंबकर यांना या जबाबदारीसाठी निवडण्यात आले आहे. नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड ९ डिसेंबर रोजी आमदारांच्या बहुमताने होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख