Saturday, July 27, 2024

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत

Share

Lok Sabha Election : “जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन”, असं विधान हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) ने केलं आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त केला जात आहे.

“राजकारण आणि चित्रपट याच्यात तालमेळ कसा साधणार? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, “मला चित्रपटांमध्येही कंटाळा येतो. मी अभिनयही करते, दिग्दर्शनही करते. मला एकाच कामावर लक्ष्य केंद्रीत करायला आवडेल”, असं ती म्हणाली.

“जर लोकांना माझी गरज आहे असं मला वाटलं तर मी त्याच दिशेला प्रवास करेन. मी जर मंडीतून विजयी झाले तर मी राजकारणच करेन. मला अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते राजकारणात जाऊ नको असं सांगतात. तुम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांना सिद्ध होऊन दाखवावं लागतं. जर स्वत:च्या महत्वाकाक्षांमुळे लोकांना भोगावं लागत असेल तर ती योग्य बाब नाही. मी एक आलिशान आयुष्य जगलं आहे. आता जर लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळत असेल तर मी ती पूर्ण करेन. मला असं वाटतं की, सर्वात आधी लोकांना आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे,” असं ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली की, “आपण घऱाणेशाहीला राजकारण आणि चित्रपटांपुरतं मर्यादित केलं आहे. घराणेशाहीची सर्वांना समस्या असली पाहिजे. या जगाचा कोणताच अंत नाही. तुम्हाला ममतेच्या प्रेमातून वरती यावं लागतं. आज मला लोक मंडीची मुलगी म्हणतात. हे माझं कुटुंब आहे. तुमची ममता तुम्हाला दुर्बळ करणारी नसावी”.

अन्य लेख

संबंधित लेख