Saturday, July 27, 2024

श्रीरामलल्लाला नवीन वस्त्रे

Share

नववर्ष विक्रम संवत २०८१ चा आरंभ झाला आहे. चैत्र नवरात्रीच्या शुभारंभापासून अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्ला विशेष वस्त्र परिधान करणार आहेत. श्रीरामनवमीपर्यंत श्रीरामलल्ला रोज नवीन वस्त्र परिधान करतील. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच प्रभू श्रीरामांच्या वस्त्रांची शैली बदलण्यात आली आहे.

ही वस्त्रे खादी-कॉटनपासून तयार करण्यात आली आहेत. सोन्या – चांदीच्या तारांनी यावरील हस्तछपाई करण्यात आली आहे. या डिझाईनमध्ये वापरण्यात आलेली सगळी चिन्हे वैष्णव पद्धतीची आहेत. मोर, पाने-फुले, कमळाची फुले आणि अन्य वैष्णव चिन्हे विविधरंगी रेशीम धाग्यांनी आणि सोन्या-चांदीच्या जरीने लाल, श्वेतवस्त्रांवर विणण्यात आली आहेत. यासाठी विविध प्रकारची नक्षी असलेले हँडब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे वस्त्रावर देखणी नक्षी साकारण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी रोज गर्दी उसळते आहे. पुढील काही दिवस श्रीरामाची ही नवीन वस्त्रे हेही आकर्षण ठरू शकते.

अन्य लेख

संबंधित लेख